भजनी मालिका
← भजनांकडे परत

सर्वही सुखाचें वोतिलें श्रीमुख । त्रिभुवन नायक पंढरीये

sarvahi sukhachen votilen shrimukh | tribhuvan nayak pandhariye

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
सर्वही सुखाचें वोतिलें श्रीमुख । त्रिभुवन नायक पंढरीये ॥१॥ कर दोन्हीं कटीं सम पाय विटे । शोभले गोमतें बाळरूप ॥२॥ जीवाचें जीवन योगियांचे धन । चोखा म्हणे मंडन तिन्ही लोकीं ॥३॥