भजनी मालिका
← भजनांकडे परत

सकळा आगराचें जें मूळ । तो हा सोज्वळ विठू माझा

sakala agarachen jen mul | to ha sojval vithu majha

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
सकळा आगराचें जें मूळ । तो हा सोज्वळ विठू माझा ॥१॥ वेदांचा विचार शास्त्रांची जे गती । तोचि हा श्रीपती विठु माझा ॥२॥ कैवल्य देखणा सिद्धांचा जो राणा । भाविकासी खुणा विठू माझा ॥३॥ चोखा म्हणे माझ्या ह्रदयीं बिंबला । त्रिभुवनीं प्रकाशला विठू माझा ॥४॥