भजनी मालिका
← भजनांकडे परत

फुलाचे अंगीं सुवास असे । फूल वाळलिया सुवास नासे

phulache angin suvas ase | phul valaliya suvas nase

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
फुलाचे अंगीं सुवास असे । फूल वाळलिया सुवास नासे ॥१॥ मृत्तिकेचे घट केले नानापरी । नाव ठेविलें रांझण माथण घागरी ॥२॥ विराली मृत्तिका फुटले घट । प्राणी कां फुकट शोक करी ॥३॥ चोखा म्हणे ऐसें मृगजळ पाही । विवेकी तिये ठायीं न गुंतेची ॥४॥