भजनी मालिका
← भजनांकडे परत

पंढरीचें सुख नाहीं त्रिभुवनीं । प्रत्यक्ष चक्रपाणी उभा असे

pandharichen sukh nahin tribhuvanin | pratyaksha chakrapani ubha ase

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
पंढरीचें सुख नाहीं त्रिभुवनीं । प्रत्यक्ष चक्रपाणी उभा असे ॥१॥ त्रिभुवनीं समर्थ ऐसें पैं तीर्थ । दक्षिणमुख वाहात चंद्रभागा ॥२॥ सकळ संतांचा मुगुटमणि देखा । पुंडलीक सखा आहे जेथें ॥३॥ चोखा म्हणे तेथें सुखाची मिराशी । भोळ्या भाविकासी अखंडित ॥४॥