भजनी मालिका
← भजनांकडे परत

पंचही भूतांचा एकचि विटाळ । अवघाचि मेळ जगीं नांदे

panchahi bhutancha ekachi vital | avaghachi mel jagin nande

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
पंचही भूतांचा एकचि विटाळ । अवघाचि मेळ जगीं नांदे ॥१॥ तेथें तो सोंवळा वोंवळा तो कोण । विटाळाचें कारण देह मूळ ॥२॥ आदिअंती अवघा विटाळ संचला । सोंवळा तो झाला कोण न कळे ॥३॥ चोखा म्हणे मज नवल वाटतें । विटाळा परतें आहे कोण ॥४॥