भजनी मालिका
← भजनांकडे परत

पडलें दूर देशीं मज आठवें मानसीं

padalen dur deshin maj athaven manasin

पडलें दूर देशीं मज आठवें मानसीं । नको नको हा वियोग कष्ट होताती जिवासीं ॥१॥ दिनु तैसी रजनीं जालिगे माये । अवस्था लावूनी गेला अझुनी कां नये ॥२॥ गरुडवाहनागंभिरा येईगा दातारा । बापरखुमादेविवरा श्रीविठ्ठला ॥३॥