भजनी मालिका
← भजनांकडे परत

नवमासवरी म्यां वाहिलास उदरीं। आस केली थोरी होसी म्हणोनी

navamasavari myan vahilas udarin| as keli thori hosi mhanoni

रचनाकार: संत गोणाई · अभंग
नवमासवरी म्यां वाहिलास उदरीं। आस केली थोरी होसी म्हणोनी ||१|| शेखीं त्वां रे नाम्या ऐसें काय केलें । वनीं मोकलिलें निरंजनीं ||२|| कारे नामदेवा जालासी निष्ठुर न बोलसी उत्तर मजसि कांहीं।।३।। सज्जन सोयरीं सांडियेली लाज। जालासि निर्लज एकसरा||४|| प्रेमपिसें तुज लाविले विठ्ठलें। रूप दावुनि केलें तद्रूप तुज ॥५॥ यासि सेविलिया कैंची बाप माय सर्व हाचि होय सर्वांठायीं ॥६॥ ऐसियाचा संग धरियला तुवां । परिणाम अनुभवा जाणशील ॥७॥ संत सनकादिकां लावियेलें वेधीं । तींहीं संसार उपाधि सांडियेली ॥८॥ विठ्ठल विठ्ठल हेंचि पैं चिंतन। विटेसहित चरण धरियेले।।९।। ऐसें शिकवितां नाम्याचें न मोहरे चित्त पाहतसे तटस्थ तन्मय दृष्टी ॥ १०॥ नामा म्हणे माते वायां कां कष्टसी । विठोबा जीवेंसि जडला जाण ।।११।।