भजनी मालिका
← भजनांकडे परत

मुळींचा संचला आला गेला कोठें । पुंडलीक पेठे विटेवरी

mulincha sanchala ala gela kothen | pundalik pethe vitevari

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
मुळींचा संचला आला गेला कोठें । पुंडलीक पेठे विटेवरी ॥१॥ विठोबा देखणा विठोबा देखणा । योगियांचा राणा पंढरिये ॥२॥ भाविका कारणें उभारोनि हात । वाट जो पहात अनुदिनी ॥३॥ चोखा म्हणे ऐसा भक्तांचा कृपाळ । दीनांचा दयाळ पंढरीये ॥४॥