भजनी मालिका
← भजनांकडे परत

मोहळा मक्षिका गुंतली गोडीसी । तैशापरी मानसीं नाम जपे

mohala makshika guntali godisi | taishapari manasin nam jape

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
मोहळा मक्षिका गुंतली गोडीसी । तैशापरी मानसीं नाम जपे ॥१॥ मग तुज बंधन न घडे सर्वथा । राम नाम म्हणतां होसी मुक्त ॥२॥ न करी कायाक्लेश उपवास पारणें । नाम संकीर्तनें कार्यसिद्धी ॥३॥ चोखा म्हणे एकांतीं लोकांती नाम जपे श्रीराम । तेणें होसी निष्काम इये जनीं ॥४॥