भजनी मालिका
← भजनांकडे परत

माता म्हणे नामा राऊळाशी खेळतां । तुज कोण्या दैवता ओडियलें

mata mhane nama raulashi khelatan | tuj konya daivata odiyalen

रचनाकार: संत गोणाई · अभंग
माता म्हणे नामा राऊळाशी खेळतां । तुज कोण्या दैवता ओडियलें।।१।। लाजिरवाणें नाम्या तुवां केलें जिणें हांसती पिशुने देशोदेशीं ।। २ ।। सोडि देवपिसें नको करूं ऐसें व घर कैसें बुडविसी ||३|| जन्मा येऊनियां पराक्रम करीं । कां होसी संसारीं भूमिभार ।।४।। सुदैवाची लेंकरें वर्तताति कैसीं तूं मज जालासि कुळक्षय ॥५॥ कैसी तुज नाहीं लौकिकाची लाज हेंचि थोर मज नवल वाटे ||६|| अभिमान अहंता सांडुनियां जगीं । नाचतोसि रंगीं गीत गातां ||७|| तुजविण लोक अज्ञान नसती। क्षण न विसंबती मायबापा ।।८।। पुत्र आणि कलत्र घराची विपत्ति। तुज अभाग्याचे चित्त पंढरीनाथ ॥९॥ यातें भजती त्याचें न उरेचि कांहीं। हाचि देव पाहीं घरघेणा ||१०|| जयाचें खुंटे तो लागे याच्या पंथें। तुजसि शिकवितें म्हणोनियां ।। ११।। गोणाई म्हणे नाम्या हैं नव्हे में भलें। विठोबानें केलें आपणा ऐसें ।। १२ ।।