भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझें घर तुवां पूर्वीच बुडविलें जें दर्शनासी आलें बाळ माझें

majhen ghar tuvan purvich budavilen jen darshanasi alen bal majhen

रचनाकार: संत गोणाई · अभंग
माझें घर तुवां पूर्वीच बुडविलें जें दर्शनासी आलें बाळ माझें ।।१।। नेणों काय वर्म तुझें सांपडलें हातीं । रिघालासी चित्तीं जेणें द्वारें ॥२॥ लौकिक परिहार देखील कासया । मी तुज ऐसिया बरवें जाणें ॥३॥ कटीं ठेउनि कर उभा गरुडपारी हैं तंव अंतरीं हारपला ।।४।। नाहीं चळणवळण न लावी पात्या पातें। लागलें निरूतें लक्ष तुझें ॥५॥ तुझी याची खूण अंतरींची एकी । दाविसी लौकिकीं भिन्नपण ॥६॥ सांडियेली येणें लौकिकाची लाज नव्हे माझा मज कांहीं केल्या ||७|| तुझेंनि सुखें घाला आनारिमा जाला अभिमान मावळला समूळ याचा ||८|| देहीं में असोनी विदेही दिसत। प्रेमें वोसंडत हृदयकमळीं ।।९।। तूं अनाथा कैवारी ऐसी वेदवाणी परी कां नये अजोनी कणव तुज ||१०|| गोणाई म्हणे माझा नामा देई हाती लागेन पुढता-मुझे।।११।।