भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझा तंव अवघा खुंटला उपाय । रिता दिसे ठाव मजलागीं

majha tanv avagha khuntala upay | rita dise thav majalagin

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
माझा तंव अवघा खुंटला उपाय । रिता दिसे ठाव मजलागीं ॥१॥ करितोचि दिसे अवघेचि वाव । सुख दु:ख ठाव अधिकाधिक ॥२॥ लिगाडाची माशी तैसी झाली परी । जाये तळीवरी सुटका नव्हे ॥३॥ चोखा म्हणे अहो दीनांच्या दयाळा । पाळा कळवळा माझा देवा ॥४॥