भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझा मी विचार केला असे मना । चाळवण नारायणा पुरें तुमचें

majha mi vichar kela ase mana | chalavan narayana puren tumachen

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
माझा मी विचार केला असे मना । चाळवण नारायणा पुरें तुमचें ॥१॥ तुम्हांवरी भार घातिलेंसें वोझें । हेंचि मी माझें जाणतसें ॥२॥ वाउगें बोलावें दिसे फलकट । नाहीं बळकट वर्म आंगीं ॥३॥ चोखा म्हणे सुखें बैसेन धरणा । तुमच्या थोरपणा येईल लाज ॥४॥