भजनी मालिका
← भजनांकडे परत

मज तो नवल वाटतसे जीवी । आपुली पदवी विसरले

maj to naval vatatase jivi | apuli padavi visarale

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
मज तो नवल वाटतसे जीवी । आपुली पदवी विसरले ॥१॥ कवणिया सुखा परब्रम्हा भुललें । गुंतोनी राहिलें भक्तभाके ॥२॥ निर्गुण होतें तें सगुण पैं झालें । विसरोनी गेलें आपआपणा ॥३॥ चोखा म्हणे ऐसा भक्तांचा कृपाळ । दीनांचा दय़ाळ पंढरीये ॥४॥