भजनी मालिका
← भजनांकडे परत

महादोष राशि पापाचे कळप । नामें सुखरूप कलियुगीं

mahadosh rashi papache kalap | namen sukharup kaliyugin

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
महादोष राशि पापाचे कळप । नामें सुखरूप कलियुगीं ॥१॥ म्हणोनि आळस करूं नका कोणी । नाम जपा वाणी सर्वकाळ ॥२॥ आसनीं शयनीं नामाचा आठव । आन ठावाठाव करूं नका ॥३॥ चोखा म्हणे खातां जिवितां वाचें । नाम श्रीविठ्ठलाचें उच्चारावें ॥४॥