भजनी मालिका
← भजनांकडे परत

घरदार वोखटें अवघें फलकटें । दु:खाचें गोमटें सकळही

gharadar vokhaten avaghen phalakaten | du:khachen gomaten sakalahi

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
घरदार वोखटें अवघें फलकटें । दु:खाचें गोमटें सकळही ॥१॥ नाशिवंतासाठी रडती रांडा पोरें । काय त्याचें खरें स्त्री पुत्र ॥२॥ लावूनियां मोह भुलविलें आशा । त्याचा भरंवसा धरिती जन ॥३॥ सकळही चोर अंती हे पळती । चोखा म्हणे कां न गाती रामनाम ॥४॥