भजनी मालिका
← भजनांकडे परत

गणिका अजामेळें काय साधन केलें । नामचि उच्चारिलें स्वभावतां

ganika ajamelen kay sadhan kelen | namachi uchcharilen svabhavatan

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
गणिका अजामेळें काय साधन केलें । नामचि उच्चारिलें स्वभावतां ॥१॥ नवल हें पहा नवल हें पहा । अनुभवें अनुभवा देहामाजीं ॥२॥ उच्चारितां नाम वैकुंठीचें पेणें । ऐसें दुजें कोणें आहे कोठें ॥३॥ ब्रम्हाहत्या जयासी घडल्या अपार । वाल्हा तो साचार उद्धरिला ॥४॥ सुफराटें नाम न येचि मुखासी । मारा मारा ध्यासीं स्मरतां झाला ॥५॥ चोखा म्हणे ऐसा नामाचा महिमा । उद्धार अधमा स्त्री शूद्रां ॥६॥