भजनी मालिका
← भजनांकडे परत

चोखट चांग चोखट चांग । एक माझा पांडुरंग

chokhat chang chokhat chang | ek majha pandurang

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
चोखट चांग चोखट चांग । एक माझा पांडुरंग ॥१॥ सुख तयाचे चरणीं । अवघी सुकृतांची खाणी ॥२॥ महापातकी नासले । चोखट नाम हें चांगले ॥३॥ महाद्वारी चोखामेळा । विठ्ठल पाहातसे डोळां ॥४॥