भजनी मालिका
← भजनांकडे परत

भाविकांच्या लोभा होऊनी आर्तभूत । उभाचि तिष्ठत पंढरीये

bhavikanchya lobha houni artabhut | ubhachi tishthat pandhariye

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
भाविकांच्या लोभा होऊनी आर्तभूत । उभाचि तिष्ठत पंढरीये ॥१॥ काय करों प्रेम न कळे या देवा । गुंतोनिया भावा राहे सुखें ॥२॥ वर्ण अभिमान न धरी कांही चाड । भक्तिसुख गोड तयालागीं ॥३॥ चोखा म्हणे ऐसी कनवाळु माउली । कृपेची साउली दीनां करी ॥४॥