भजनी मालिका
← भजनांकडे परत

भवाचें भय न धरा मानसीं । चिंता अहर्निशी रामनाम

bhavachen bhay na dhara manasin | chinta aharnishi ramanam

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
भवाचें भय न धरा मानसीं । चिंता अहर्निशी रामनाम ॥१॥ मंत्र हा सोपा न लगे सायास । जपा रात्रंदिवस सुलभ तें ॥२॥ दुर्लभ सर्वांसी न ये जो ध्यानासी । वेडावले ऋषि जयालागीं ॥३॥ आदिनाथ कंठी जप हा सर्वंदा । पवित्र हे सदा अखंड जपे ॥४॥ चोखा म्हणे येथें सर्वांधिकार । उंच नीच अपार तरले नामें ॥५॥