भजनी मालिका
← भजनांकडे परत

भाकसमुद्रीं भरियेलीं केणें । आणियेलें नाणें द्वारकेचें

bhakasamudrin bhariyelin kenen | aniyelen nanen dvarakechen

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
भाकसमुद्रीं भरियेलीं केणें । आणियेलें नाणें द्वारकेचें ॥१॥ बाराही मार्गाची वणीज्ज करी । पंढर हे पुरी नामदेव ॥२॥ चोखा म्हणे लोटांगणीं जाऊं । नामदेव पाहूं केशवाचा ॥३॥