भजनी मालिका
← भजनांकडे परत

बावरे मन रात्रंदिवस झालें । नावरे वाहिलें काय करूं

bavare man ratrandivas jhalen | navare vahilen kay karun

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
बावरे मन रात्रंदिवस झालें । नावरे वाहिलें काय करूं ॥१॥ येणें माझा कैसा घेतिलासे लाहो । आतां कोठे जावो देशांतरीं ॥२॥ न धरीं तयाची संगतीची गोडी । झाली वोढावोढी साच दिसे ॥३॥ चोखा म्हणे याचा न तुटे संबंध । येणें मज बाध लाविलासे ॥४॥