भजनी मालिका
← भजनांकडे परत

बावरलें मन करीं धांवा धावी । यांतुनी सोडवीं देवराया

bavaralen man karin dhanva dhavi | yantuni sodavin devaraya

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
बावरलें मन करीं धांवा धावी । यांतुनी सोडवीं देवराया ॥१॥ लागलासे चाळा काय करूं आतां । नावरे वारितां अनावर ॥२॥ तुमचें लिगाड तुम्हींच वारावें । आम्हांसी काढावें यांतोनियां ॥३॥ चोखा म्हणे तरीच जीवा होय सुख । नका आतां दु:ख दाऊं देवा ॥४॥