भजनी मालिका
← भजनांकडे परत

बहुतांचे धांवणे केलें बहुतापरी । उदार श्रीहरी वैकुंठीचा

bahutanche dhanvane kelen bahutapari | udar shrihari vaikunthicha

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
बहुतांचे धांवणे केलें बहुतापरी । उदार श्रीहरी वैकुंठीचा ॥१॥ तोचि महाराज चंद्रभागें तीरीं । उभा विटेवरी विठ्ठल देवो ॥२॥ भक्तीचा आळुका भावाचा भुकेला । न कळे ज्याची लीला ब्रम्हादिका ॥३॥ चोखा म्हणे तो हा नांदतो पंढरी । दरूशनें उद्धरी जडजीवां ॥४॥