भजनी मालिका
← भजनांकडे परत

बहुत प्रकार बहुत या जगाचे । काय वानूं त्याचे गुणदोष

bahut prakar bahut ya jagache | kay vanun tyache gunadosh

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
बहुत प्रकार बहुत या जगाचे । काय वानूं त्याचे गुणदोष ॥१॥ नीच हे याति अनामिक नांव । तेथें भावाभाव कोण कैचा ॥२॥ चाहाड चोर जार भ्रष्ट ते साचे । हीनत्व जन्मांचे पदरीं आहे ॥३॥ चोखा म्हणे त्यांचे संगती पडिलों । बहु हे पीडिलों वियोगानें ॥४॥