भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां नकां भरोवरी । तूं तों उदार श्रीहरी

atan nakan bharovari | tun ton udar shrihari

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
आतां नकां भरोवरी । तूं तों उदार श्रीहरी ॥१॥ शरणांगता पायापाशीं । अहर्निशी राखावें ॥२॥ ब्रीद गाजे चराचरीं । कृपाळु हरि दीनांचा ॥३॥ चोखा म्हणे भरंवसा । दृढ सरसा मानला ॥४॥