भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां माझा सर्व निवेदिला भाव । धरोनी एक ठाव राहिलोंसे

atan majha sarva nivedila bhav | dharoni ek thav rahilonse

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
आतां माझा सर्व निवेदिला भाव । धरोनी एक ठाव राहिलोंसे ॥१॥ जेथें काळाचाहि न पुरे हात । तयाचे पायीं चित्त समर्पिलें ॥२॥ भय नाहीं चिंता कोणता प्रकार । झालोंसे निर्भय नामबळें ॥३॥ चोखा म्हणे आतां लागलासे झरा । विठोबा दातारा याचि नामें ॥४॥