भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्हां अधिकार उच्छिष्ट सेवन । संतांचे पूजन हेंचि बरें

amhan adhikar uchchhishta sevan | santanche pujan henchi baren

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
आम्हां अधिकार उच्छिष्ट सेवन । संतांचे पूजन हेंचि बरें ॥१॥ सुलभ सोपारें विठोबाचें नाम । आणिक नाहीं वर्म दुजें काहीं ॥२॥ आवडीनें नाम गाईन उल्हासें । संतांच्या सहवासें खेळीं मेळीं ॥३॥ चोखा म्हणे माझी आवडी ही देवा । पुरवावी केशवा जन्मोजन्मी ॥४॥