भजनी मालिका

भजने

आले ते सोपान वंदिले या पायीं । पांडुरंगा ठायीं मानियेला ॥१॥ रंजल्यागांजल्याचा घेतला समाचार । संतामाया थोर अनाथांची ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

आलें फळ तेव्हां राहिलें पिकोन । जरी तें जतन होय देंठीं ॥१॥ नामें चि सिद्धी नामें चि सिद्धी । व्यभिचारबुद्धी न पवतां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आलें शरण त्याचा करी प्रतिपाळ । न म्हणे हा दुर्बळ सदैव कांहीं ॥१॥ नेदी लागों वारा कल्‍पनेचा तया । न वजे पासोनियां दुरी कोठें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

आले संत पाय ठेविती मस्तकीं । येहीं उभयलोकीं सरता केलों ॥१॥ वंदीन पाउलें लोळेन चरणीं । आजि इच्छाधणी फिटईल ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आले संन्यासी तापसी । योगी मुनिजन प्रांतवासी । पंडित पुराणिक ज्योतिषी । वेदाभ्यासी याज्ञिक ॥१॥ श्स्त्रपाणि रिक्तपाणी । पहाति कृष्णातें ते दुरुनी । अवलोकूनियां निज नयनीं । परम विस्मयातें पावती ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

आले हो संसारा तुम्ही एक करा । मुक्तीमारग हळू चि धरा । काळदंड कुंभयातना थोरा । कां रे अघोरा देखसी ना ॥१॥ नाहीं त्या यमासि करुणा । बाहेर काढितां कुडी प्राणा । ओढाळ सांपडे जैं धान्या । चोर यातना धरिजेतां ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

आलेनो संसारा सोडवणें करा । शरण जा उदारा पांडुरंगा ॥१॥ प्रपंच न सरे कदा कल्पकोडी । वासनेचि बेडी पडे पायीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

आलों उल्लंघुनि दुःखाचे पर्वत । पायांपाशीं हित तुमच्या तरी ॥१॥ न देखेचि लासा दुःखी होतें मन । कठिणें कठिण वाटतसे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आलों ऐकोनी खंडोबाची थोरी । वाघा होऊनि मज मागा म्हणती वारी ॥१॥ ठकलों ठकलों वाउगा सीण । वारी मागतां पोट न भरे जाण ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आल्या पांच गौळणी पांच रंगाचे शृंगार करुनी ॥धृं॥ पहिली गौळण रंग सफेत । जशी चंद्राची ज्योत । गगनी चांदणी लखलखीत ।

रचनाकार: संत एकनाथ

आल्हाददायकश्रीमुख चांगलें । पाहतां मोहिले भक्त सर्व ॥१॥ गाई गोपाळ विधिल्या गोपिका । श्रीमुख सुंदर देखा सजिरें तें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ