भजनी मालिका
← भजनांकडे परत

आले ते सोपान वंदिले या पायीं । पांडुरंगा ठायीं मानियेला

ale te sopan vandile ya payin | panduranga thayin maniyela

रचनाकार: संत नामदेव · अभंग
आले ते सोपान वंदिले या पायीं । पांडुरंगा ठायीं मानियेला ॥१॥ रंजल्यागांजल्याचा घेतला समाचार । संतामाया थोर अनाथांची ॥२॥ आमुचे मायबाप भेटलेति आज । समाधान सहज आलिंगितां ॥३॥ नामा म्हणे मज कळलें याचें प्रेम । देव केले श्रम काय गुणें ॥४॥