भजनी मालिका

भजने

रचियेला गांव सागराचे पोटीं । जडोनि गोमटीं नानारत्नें ॥१॥ रत्न खणोखणी सोनियाच्या भिंती । लागलिया ज्योति रविकळा ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

रज्जु धरूनियां हातीं । भेडसाविलीं नेणतीं । कळों येतां चित्तीं । दोरी दोघां सारिखी ॥१॥ तुम्हांआम्हांमध्यें हरी । जाली होती तैसी परी । मृगजळाच्या पुरीं । ठाव पाहों तरावया ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

रडती रांडापोरें नाशिवंतासाठीं । केवढी आटाआटी जीवीं होसी ॥१॥ कुडीसी मरण न कळेचि जाण । आत्मा अविनाश परिपूर्ण स्वयंज्योती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

रडे अळंकार दैन्याचिये कांती । उत्तमा विपित्तसंग घडे ॥१॥ एकाविण एक अशोभ दातारा । कृपेच्या सागरा पांडुरंगा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

रणीं निघतां शूर न पाहे माघारें । ऐशा मज धीरें राख आतां ॥१॥ संसारा हातीं अंतरलों दुरी । आतां कृपा करीं नारायणा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

रतीच्या अंती जें होय सुख । सर्वांगीं तें सर्वदा देख ॥१॥ इंद्रियाविण आहे गोडी । तेथींचा स्वादु कवण काढी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

रत्नाचे मंचकी पहले चक्रपाणी चोळीत रुक्मिणी चरणांबुज ।।१।। कानीं पडियेले द्रौपदीचे बोल । उठे घननीळ तांतडीनें ॥ २॥

रचनाकार: संत जनाबाई

रत्नाच्या वोवणी कांचे ऐशा घरी । आव्हेरुनी दुरी अधिकारें ॥१॥ जातिस्वभाव आला डोळ्यां आड । तया घडे नाड न कळतां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

रन्तखचित पालख । सूर्या ऐसा निर्भियेला चोख । निरालंबी गोऊनि देख । मोहें उत्साह मांडियेला ॥१॥ महर्षि ऋषिहि सकळिक । आले पहावया कवतुक । अवलोकूनियां यदुनायक । करिती प्राणें कुरवंडिया ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

रमासिंधुमाजी सौंदर्याची धणी । ब्रीदें चक्रपाणि मिरविती ॥१॥ मेघदेहाकृति घनःश्याम मूर्ति । नटतसे भक्तीं भक्तजना ॥२॥

रचनाकार: संत नामदेव