भजनी मालिका
← भजनांकडे परत

योगीं शीण झाला । तुजवांचुनी विठ्ठला

yogin shin jhala | tujavanchuni viththala

रचनाकार: संत नामदेव · अभंग
योगीं शीण झाला । तुजवांचुनी विठ्ठला ॥१॥ योग करितां अष्टांग । तुजविण शुका रोग ॥२॥ बैसला कपाटीं । रंभा लागे त्याच्या पाठीं ॥३॥ तईं त्वांचि सांभाळिला । जेव्हां तुज शरण आला ॥४॥ सांगोनी पुत्रातें । त्वांचि छळिलें कश्यपातें ॥५॥ अमराच्या राया । म्हणे जनी सुखालया ॥६॥