भजनी मालिका
← भजनांकडे परत

योगी हे शिणती तुझिये प्राप्तिलागीं । नातुडसी जगीं कवणासी

yogi he shinati tujhiye praptilagin | natudasi jagin kavanasi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
योगी हे शिणती तुझिये प्राप्तिलागीं । नातुडसी जगीं कवणासी ॥१॥ एक जटा नखेम स्वयें वाढविती । दिगंबर होती एक देवा ॥२॥ त्यांसी तुझी भेटी नव्हेचि कल्पांतीं । अखंड शिणती साधनानें ॥३॥ आमचे सन्निध सर्वदा राहसी । आमच्या भाग्यासी पार नाहीं ॥४॥ धन्य झालों आम्ही तुझिया प्रसादें । नाचे तुझ्या छंदें नामदेव ॥५॥