भजनी मालिका
← भजनांकडे परत

येऊनियां यम ठाकला पुढारीं । पाहे दुराचारी दुरो-नियां

yeuniyan yam thakala pudharin | pahe durachari duro-niyan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
येऊनियां यम ठाकला पुढारीं । पाहे दुराचारी दुरो-नियां ॥१॥ घाबरला मनीं कोण असे नेणे । विचारितां मनीं भां-बावला ॥२॥ पुसों लागे त्याला कोण तूं आलासी । आणिक ह्मणसी माग कांहीं ॥३॥ देव किंवा यक्ष राक्षस किन्नर । करितां निर्धार न पडे ठायीं ॥४॥ नामा ह्मणे मूर्ख पारधी तो खरा । दैव त्याच्या घरा आलें जाण ॥५॥