भजनी मालिका
← भजनांकडे परत

अगा ये भूवैकुंठपीठा । सकळां वरिष्ठा देवांचिया

aga ye bhuvaikunthapitha | sakalan varishtha devanchiya

रचनाकार: संत निळोबा · अभंग
अगा ये भूवैकुंठपीठा । सकळां वरिष्ठा देवांचिया ॥१॥ अनाथ मी शरणांगत । करा स्थापित निज सेवे ॥२॥ षडगुण ऐश्वर्य भागयवंता । अहो रमाकांता श्रीविठठला ॥३॥ निळा म्हणे विश्वंभरा । करुणाकरा मज तारी ॥४॥