भजनी मालिका
← भजनांकडे परत

येऊनियां जन्मा एक करा देहाचें सार्थक

yeuniyan janma ek kara dehachen sarthak

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
येऊनियां जन्मा एक करा देहाचें सार्थक।।१।। वाचें नाम विठ्ठलाचें । तेणें सार्थक जन्माचें ||२|| ऐसा नामाचा महिमा शेष वर्णितां झाली सीमा ||३॥ नाम शास्त्रीं त्रिभुवनीं म्हणे नामयाची जनी ।।४