भजनी मालिका
← भजनांकडे परत

अंगीं हो मैं शांती दया क्षमा सर्वांभूतीं

angin ho main shanti daya kshama sarvambhutin

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
अंगीं हो मैं शांती दया क्षमा सर्वांभूतीं ।। १ ।। जेथें जाऊन पाहे देवा ब्रह्मादिक करिती सेवा ॥२॥ आवडी असे पैं कीर्तनीं । लवे संतांचे चरणीं ॥३॥ जैसी दया पुत्रावरी । तेंचि पाहे चराचरीं ||४|| बहु अपराध केला म्हणे जनी तो रक्षिला ॥५॥