भजनी मालिका
← भजनांकडे परत

येत येत उभा राजबिदीं । सर्वें चाले गोपाळांची मांदी । नारी पाहती उभया बिदीं । एकीच्या धरूनि बाहुवा खांदीं

yet yet ubha rajabidin | sarven chale gopalanchi mandi | nari pahati ubhaya bidin | ekichya dharuni bahuva khandin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
येत येत उभा राजबिदीं । सर्वें चाले गोपाळांची मांदी । नारी पाहती उभया बिदीं । एकीच्या धरूनि बाहुवा खांदीं ॥१॥ हरिहरनंदना साद्दश्य लोचना । डोळ्यां वेगळा न बा जासी कान्हा । अरे कान्हा मनमोहना । गोपी भुलल्या तुझिया गुणा ॥ध्रु०॥ चतुर्वेद नागवी भाट सांगातें । उभया वर्णितां रामकृष्णातें । श्रुति स्मृति विद्यावंतें । जय जय म्हणती कृपानिधितें ॥२॥ येत येत उभा रहात । सुदाम्याच्या खांद्यावरी हात । समद्दष्टी गोपिका न्याहाळीत । चैतन्य चोरोनि आनंदें डुल्लत ॥३॥ ऐसा कृष्ण सौभाग्यसुंदर । लावण्य गुण रत्नाकर । विष्णुदास नामयाचा दातार । भक्ति भावें वोळंगा सारंगधर ॥४॥