भजनी मालिका
← भजनांकडे परत

येणेंरुपें पाहावसी तरि असुमाय होसी

yenenrupen pahavasi tari asumay hosi

येणेंरुपें पाहावसी तरि असुमाय होसी । माझ्या मना नाकळसी सांवळ्या ॥१॥ सगुणपणाची तुझी पडिलिसे मिठी । केली जीवा साटी सांवळ्या । वेधला जिऊ माझा सिकवाल काई । सगुणें ठाई वेधियेलें ॥२॥ ये अंगणी अवचिता देखिला बोलता । कोण ऐसा निरुता न कळेगे माये ॥ सगुण म्हणौनि धरुं गेलें पालवीं । तंव नवलपणाची ठेवी प्रगट केली ॥३॥ आंतु बाहेरी कांही नकळे वो मज । आपआपणया चोज वाटोनि ठेलें ॥ बापरखुमादेविवरें माझें मीपण चोरुनि नेलें । आपणा ऐसें केलें बाईयांवो ॥४॥