भजनी मालिका
← भजनांकडे परत

येकी सांगे मातु येकी सांगे रेतु

yeki sange matu yeki sange retu

येकी सांगे मातु येकी सांगे रेतु । तो कोण दृष्टांतु सखिये सांगे ॥१॥ बाई येक सरें नाहीं पैं दुसरें । निवृत्ति दातारें सांगीतलें ॥२॥ पांचांची मिळणी साही चक्रपाणी । दशमाची कहाणी येकादश ॥३॥ ज्ञानदेवी सार चौवेदीं पार । येकत्त्वीं विचार विज्ञानेसी ॥४॥