भजनी मालिका
← भजनांकडे परत

येईं तूं उपेंद्रे विठ्ठ महिंद्रे । देवामाजी भद्रे सिंहासनीं

yein tun upendre viththa mahindre | devamaji bhadre sinhasanin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
येईं तूं उपेंद्रे विठ्ठ महिंद्रे । देवामाजी भद्रे सिंहासनीं ॥१॥ त्राहे वो जननी शिणलों गे माये । तुजविण आहे कवण मज ॥२॥ तूं माझें कारुण्य प्रत्यक्ष सौजन्य । विचारितां प्रवीण प्रबुद्ध हो ॥३॥ पावे वो तूं वेगीं उपेंद्रे गे माते । पुंडलिक सांगातें पंढरीसी ॥४॥ दीपकु लविला दीन उगवला । दीपकें फळला पांडुरंग ॥५॥ नामा ह्मणे नाम उपेंद्र ऐसें शम । पावेन विश्राम नाम घेतां ॥६॥