भजनी मालिका
← भजनांकडे परत

येईं तूं हरीरूपेम विठ्ठल स्वरूपे । कळिकाळ कांपे नाम घेतां

yein tun harirupem viththal svarupe | kalikal kampe nam ghetan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
येईं तूं हरीरूपेम विठ्ठल स्वरूपे । कळिकाळ कांपे नाम घेतां ॥१॥ नामें हरिहरि त्राहे वो झडकरी । शिणलों मी भारी जननीये ॥२॥ हरिनामधन सर्व जनार्दन । हरी हेम आठवण जिव्हे सदा ॥३॥ हरीहरी म्हणतां हरीरूप स्मता । नाम हें अनंताक्षर विलसे ॥४॥ येईं तूं हरी गंगे सांवळे सुर्मगे । हरीहरी संगें रतलोंसे ॥५॥ नामा म्हणे हरी पांडुरंग माझा । चरण हो भोजा राज्य धरू ॥६॥