भजनी मालिका
← भजनांकडे परत

यशोदे भोंवल्या मिळाल्या गौळणी । सांगती गार्‍हाणी नानापरी

yashode bhonvalya milalya gaulani | sangati gar‍hani nanapari

रचनाकार: संत नामदेव · अभंग
यशोदे भोंवल्या मिळाल्या गौळणी । सांगती गार्‍हाणी नानापरी ॥१॥ गोरस भक्षोनि फोडितो भाजन । गोकुळा सोडोनि जाऊं सये ॥२॥ एक गोपी ह्मणे माझ्या घरां येसी । बांधीन खांबासी तुजलागीं ॥३॥ यशोदेसी ऐसी सांगोनि गार्‍हाणीं । चा-लिल्या कामिनी गृहाप्रती ॥४॥ नाना ह्मणे गोपी बोलिली बांधीन । तिजवरी विघ्न करी देव ॥५॥