भजनी मालिका
← भजनांकडे परत

यशोदा घुसळीत । स्तन मागे भगवंत

yashoda ghusalit | stan mage bhagavant

रचनाकार: संत नामदेव · अभंग
यशोदा घुसळीत । स्तन मागे भगवंत ॥१॥ घालोनी पदर । पाजीतसे जगदीश्वर ॥२॥ दूध जातसे उतोन । उठे कृष्णासी टाकून ॥३॥ मंथन पात्रातें फोडीत । पळे तेथूनि त्वरित ॥४॥ मागें धांवली यशोदा । धरावया त्या गोविंदा ॥५॥ हातीं न लगे जगजेठी । नामा ह्मणे होय कष्टी ॥६॥