भजनी मालिका
← भजनांकडे परत

यमुनेचा जो विहारीं । तोचि हा उभा पंढरपुरीं

yamunecha jo viharin | tochi ha ubha pandharapurin

रचनाकार: संत निळोबा · अभंग
यमुनेचा जो विहारीं । तोचि हा उभा पंढरपुरीं ॥१॥ दह्या-दुधाचा सुकाळ । कार्तिकीये पर्वकाळ ॥२॥ नवनिताचे गोळे । क्षीरामृताचे कल्लोळे ॥३॥ निळा म्हणे अंळकार । वस्त्रें मिरवी रमावर ॥४॥