भजनी मालिका
← भजनांकडे परत

यमुने पाबळी देखियेली मूर्ती । तळपती दीप्ति तेजो-मय

yamune pabali dekhiyeli murti | talapati dipti tejo-may

रचनाकार: संत नामदेव · अभंग
यमुने पाबळी देखियेली मूर्ती । तळपती दीप्ति तेजो-मय ॥१॥ सांवळें सुंदर ओंकार वर्तुळ । मध्यें घननीळ पाचारितो ॥२॥ सुरंग ओतिली प्रेमतनु छाया । तेणें तुझी माया काय बाणूं ॥३॥ नामा ह्मणे विठो चातुर्य करुणा । गुणागुणीं किरणा प्रभा भासे ॥४॥