भजनी मालिका
← भजनांकडे परत

या पिकलिया अमृताची गोडी

ya pikaliya amrutachi godi

या पिकलिया अमृताची गोडी । केंवि जाणती इतर जन । वाचा बोलिजे सेवितां निवे प्राणुगे माये ॥१॥ सुखाचा साचा केंवी बोलिजे । जिवातें केंवि सुईजे ॥२॥ अमृतकराचे रश्मी चकोर सेविती । तें सुख कोण कैसें बोलिजे रया ॥३॥ बापरखुमादेविवरु विठ्ठलु भेटलिया । तें सुख कोण कैसें सांगिजे रया ॥४॥