भजनी मालिका
← भजनांकडे परत

वियोग नाम्याचा न साहे गोपाळा । न जाय राउळा पांडुरंग

viyog namyacha na sahe gopala | na jay raula pandurang

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
वियोग नाम्याचा न साहे गोपाळा । न जाय राउळा पांडुरंग ॥१॥ पद्माळ्यांत तेव्हां राहे विश्वंभर । कले समाचार रुक्मिणीसी।।२।। चलायें मंदिरी स्वामी पुरुषोत्तमा येईल मे नामा माझा जेव्हां ॥ तयाविण मज दाही दिशा ओस। न लगे चित्तास गोड कांहीं ||४|| जनी म्हणे ऐसी आवड नाम्याची । म्हणोनियां त्याची झाले दासी॥५॥