भजनी मालिका
← भजनांकडे परत

विठ्ठल विद्‌गदे पुंडलिकवरदे । अनंत अभेदे नामें तुझीं

viththal vid‌gade pundalikavarade | anant abhede namen tujhin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
विठ्ठल विद्‌गदे पुंडलिकवरदे । अनंत अभेदे नामें तुझीं ॥१॥ पाव गे विठ्ठले मजलागीं झडकरी । बुडतों भवसागरीं काढीं मज ॥२॥ आकांत अवसरीं स्मरलें साच । दीनानाथें ब्रीदें सत्य केलीं ॥३॥ स्मरली संकटी द्रौपदी वनवासी । धांवोनि आलासि लवडसवडीं ॥४॥ प्रल्हादें तुजलागीं स्मरिलें निर्वाणीं । संकटापासोनि राखियेलें ॥५॥ नामा म्हणे थोर पीडिलों गर्भवासें । अखंड पाहातसें वास तुझी ॥६॥