भजनी मालिका
← भजनांकडे परत

अव्यक्ताच्या घरी प्रकृति कामारी

avyaktachya ghari prakruti kamari

रचनाकार: संत सोपान · अभंग
अव्यक्ताच्या घरी प्रकृति कामारी । निषधे माजि घरी दडोनिया ॥१॥ तैसे नका करू प्रगट सर्वेश्वरू । हरिनाम उच्चास जपा वाचे ।।२।। विज्ञानी पै ज्ञान आटलेसे संपूर्ण । उभयता चैतन्य तैसा हरि ॥३॥ सोपान निवांत रामनामी रत । संसार उचित रामनामे ।।४।।